Dolly Chaiwala Bill Gates Viral Video : गुगल, यूट्यूब तसेच सोशल मीडियावर एक जोरदार व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये मायक्रोसॉफ्ट चे मालक बिल गेट्स ( Bill Gates ) हे चाय पिण्यासाठी एका टपरीवर जातात आणि चहाची मागणी करतात. हा व्हिडिओ खूप वेगवान गतीने इंटरनेटवर वायरल होत आहे तर जाणून घेऊया डॉली चाय वाला कोण आहे ? आणि चक्क मायक्रोसॉफ्ट चे मालक बिल गेट्स ( Bill Gates ) हे चाय पिण्यासाठी तिथे का गेले.
डॉली चाय वाला हा त्याच्या चहा बनवण्याच्या आणि चहा विकण्याच्या कलागुणांनी सोशल मीडियावर खूप फेमस आहे. त्याचा काही दिवसापूर्वी चा व्हिडिओ इंटरनेटवर खूप वायरल होत आहे. त्या व्हिडिओत डॉली सोबत जो व्यक्ती आहे तो सामान्य नागरिक नसून MICROSOFT कंपनीचा CEO व जगात सर्वात श्रीमंत असणाऱ्या यादीत नाव असणारे बिल गेट्स ( Bill Gates ) हे आहेत.
Who Is Dolly Chaiwala ? : डॉली चायवाला कोण आहे
तुमच्यातील बऱ्याच लोकांना डॉली चाय वाला कोण आहे हे माहित नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगायचे झाले तर डॉली चायवाला हा नागपूरमधील VS स्टेडियम जवळ ‘डॉली की टपरी’ या नावाने प्रसिद्ध आहे. नागपूर मध्ये डॉलीची चहा खूप प्रसिद्ध आहे बरेच लोक त्याच्या चहाचा आनंद घेण्यासाठी तिथे जातात.डॉली चाय वाला हा त्याच्या चहा बनवण्याच्या आणि चहा विकण्याच्या कलागुणांनी सोशल मीडियावर खूप फेमस आहे.
Dolly Chaiwala Bill Gates Viral Video :
Dolly Chaiwala ची चहा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी बिल गेट्स ( Bill Gates ) हे डॉलीच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांच्या हटक्या अंदाजात One Chai Please असे बोलून चहाची ऑर्डर दिली.
28 फेब्रुवारीला बिल गेट्स ने आपल्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंट वर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये ते चहाचा आनंद घेताना दिसत होते. व्हिडिओच्या सुरुवातीला बिल गेट्स ( Bill Gates ) हे One Chai Please असे बोलताना दिसतात त्यानंतर डॉली चाय वाला हा त्याच्या अनोख्या अंदाजात दूध, चहा पत्ती, अद्रक आणि इलायची टाकून चविष्ट चहा बनवतो आणि बिल गेट्स ला देतो. बिल गेट्स ने हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले की,
In India, you can find innovation everywhere you turn-even in the preparation of a simple cup of tea! – भारतात, तुम्ही सर्वत्र नावीन्य शोधू शकता अगदी साध्या कप चहाच्या तयारीतही !
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे आणि लोक त्यांच्या अनोख्या मुलाखतीबाबत चर्चा करत आहेत.
One Chai Please Bill Gates Viral Video : चक्क चहा पिण्यासाठी बिल गेट्स गेले डॉली च्या टपरीवर
तर तुम्हाला माहीत झालं असेल की बिल गेट्स चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. ज्यामध्ये ते डॉली चहा वाल्याकडे चहा पिताना दिसत आहेत. परंतु हा व्हिडिओ नागपूरचा नसून हैदराबाद मध्ये बनवून घेतला आहे. बिल गेट्स ने 28 फेब्रुवारीला हैदराबाद मधील मायक्रोसॉफ्ट भारत विकास केंद्राचा दौरा केला होता तिथेच त्यांनी हा व्हिडिओ शूट केला. याची माहिती डॉली चा भाऊ शैलेश ने TOI ला दिलेल्या इंटरव्यू मध्ये सांगितले. शैलेश च्या माहितीनुसार डॉलीला कोलाब्रेशन व्हिडिओ बनवण्यासाठी बिल गेटच्या ऑफिसमधून बोलावले गेले होते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जोरदार व्हायरल होत आहे या व्हिडिओवर 10CR+ ( दहा करोड ) पेक्षा जास्त Views आणि 70Lac+ ( 70 लाख ) पेक्षा जास्त लाईक आले आहेत.
हे देखील वाचा : Shivrayancha Chhava Movie Review | Shivrayancha Chhava Movie Cast | छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची प्रेरणादायी शौर्यगाथा