IPL 2024 SCHEDULE | क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! या तारखेपासून सुरू होणार IPL चा महासंग्राम

IPL 2024

भारतातील क्रिकेट प्रेमींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. यंदा होणाऱ्या TATA IPL चे सर्वात मोठे अपडेट समोर आले आहेत. देशात यावर्षी लोकसभा निवडणुका असल्याने IPL चे सामने भारतात खेळवण्यात येणार की नाही याबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी खुलासा करत सांगितले की यंदा होणाऱ्या IPL चे सर्व सामने भारतातच खेळवले जातील. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्यामुळे IPL चे ही वेळापत्रक अजून सुद्धा घोषित केले नाही असं त्यांनी म्हटलं.

IPL 2024 SCHEDULE | आयपीएल २०२४ ची तारीख झाली जाहीर

अरुण धुमल यांनी बैठकीत सांगितले की IPL 2024 ची स्पर्धा येत्या २२ मार्चला सुरू होणार आहे. मात्र सुरुवातीला पहिल्या १५ दिवसांच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.

यापूर्वी २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचा संपूर्ण हंगाम दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला होता तर २०१४ मध्ये आयपीएलचे काही सामने भारतात खेळवण्यात आले तर काही सामने यूएईमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मात्र संपूर्ण आयपीएल भारतातच खेळवण्यात आली होती, आणि आताही ही स्पर्धा भारतातच होणार असल्याने देशातील क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.

Leave a Comment