Shivrayancha Chhava Movie Review :
शिवरायांचा छावा..” सिनेमाची कथा सुरू होते संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून. शिवरायांच्या मृत्यूनंतर रयत काहीसा पोरकेपणा अनुभवत असते. या रयतेला आधार देण्यासाठी आणि स्वराज्याचा कारभार सांभाळण्यासाठी संभाजी महाराज राज्यकारभाराची सूत्र हाती घेतात. रायगडावर शंभूराजांचा थाटामाटात राज्याभिषेक सोहळा पार पडतो.शिवाजी महाराजांनंतर दख्खन आणि महाराष्ट्र आपल्या ताब्यात घेण्यासाठी दिल्लीत औरंगजेब दबा धरून बसलेला असतो. तिकडे बुऱ्हाणपूरात काकर खान गोरगरीब रयतेकडून जोरजबरदस्तीने करवसुली करण्यासाठी आक्रमक होतो. नुकतेच स्वराज्याचे छत्रपती झालेल्या संभाजी महाराजांना ही गोष्ट कळताच त्यांचा राग अनावर होतो. मग शंभूराजे एक मोहीम हाती घेतात. ही मोहीम कोणती? आणि स्वराज्यावर डोळा ठेवून असलेल्या गनीमांचा सामना ते कसा करतात?याची कहाणी ‘शिवरायांचा छावा’ सिनेमातून कळते.
‘शिवरायांचा छावा’ सिनेमात वेळोवेळी संभाजी महाराजांच्या आठवणीतून शिवाजी महाराज यांनी त्यांना दिलेल्या शिकवणीचा उलगडा होतो. सिनेमा अनेकदा फ्लॅशबॅक मध्ये जाऊन शिव-शंभू या पिता-पुत्राचं नातं आपल्याला दाखवतो. क्वचित वेळी दोघांनाही स्वराज्याची शिकवण देणाऱ्या जिजाऊ मांसाहेब सुध्दा दिसतात ‘शिवरायांचा छावा’ सिनेमाची एक विशेष गोष्ट सांगता येईल ती म्हणजे..आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावर जे सिनेमे आले किंवा नाटकं आली, त्या सर्व कलाकृतींमध्ये संभाजी महाराजांभोवती चालणारं राजकारण, त्यांच्यावर झालेला अन्याय, शिवाजी महाराज-संभाजी महाराज यांच्यात झालेले मतभेद अशा गोष्टी दाखवण्यात आल्या. ‘शिवरायांचा छावा’ सिनेमात मात्र या गोष्टी टाळण्यात आल्या आहेत.संपूर्ण सिनेमा शंभूराजांच्या धाडसी व्यक्तिमत्वाची ओळखकरून देतो. सिनेमाच्या शेवटी “शौर्यगाथा पुढे सुरू राहील..”, अशी पाटी झळकते. त्यामुळे असे लक्षात येते की या चित्रपटाचे पुढील भाग दिग्पाल लांजेकर निर्माण करतील.
या चित्रपटात सर्व कलाकारांनी आप-आपली भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली. तसेच या चित्रपटात असलेल्या संगीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली या संगीता मागे असणाऱ्या देवदत्त बाजीचे कौतुक करावे लागेल.
Shivrayancha Chhava Movie Cast
Director :
Digpal Lanjekar ( दिग्पाल लांजेकर ) : दिग्पाल लांजेकर हे मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आहेत. त्यांनी फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार यासारखे चित्रपट प्रदर्शित केले.
Actor :
1.Bhushan Patil : भूषण पाटील हा महाराष्ट्राचा नवतरुण अभिनेता आहे त्याने सध्याच प्रकाशित झालेल्या“शिवरायांचा छावा..” या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत अभिनय केला.
2.Trupti Toradmal : तृप्ती तोरडमल ही भारतीय अभिनेत्री आहे ती प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि तमिळ चित्रपटात काम करते तिने फत्तेशिकस्त आणि आधीपुरुष या चित्रपटात काम केले तसेच सध्याच प्रकाशित झालेल्या “शिवरायांचा छावा..” या चित्रपटात महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत अभिनय केला.
3.Mrinal Kulkarni : मृणाल कुलकर्णी या भारतीय अभिनेत्री, लेखिका व दिग्दर्शिका आहेत त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात काम केले तसेच सध्याच प्रकाशित झालेल्या “शिवरायांचा छावा.. या चित्रपटात राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत अभिनय केला.
4.Chinmay Mandlekar : चिन्मय मांडलेकर हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांनी क्रांतिवीर राजगुरू ,गजर ,फर्जंद ,मोरया अशा बऱ्याच चित्रपटात काम केले तसेच सध्याच प्रकाशित झालेल्या “शिवरायांचा छावा..” या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत अभिनय केला.
5.Vikram Gaikwad : विक्रम गायकवाड हे एक भारतीय अभिनेते तसेच मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहेत त्यांनी ३ इडियट्स, भाग मिल्खा भाग,दंगल अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच सध्याच प्रकाशित झालेल्या “शिवरायांचा छावा..” या चित्रपटात त्यांनी कवी कलश यांच्या भूमिकेत अभिनय केला.
6.Ravi Kale : रवी काळे हे भारतीय प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांनी मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड व तेलुगु अशा बऱ्याच चित्रपटात काम केले आहे तसेच सध्याच प्रकाशित झालेल्या “शिवरायांचा छावा..” या चित्रपटात बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत अभिनय केला.
7.Abhijeet Shwetachandra : अभिजीत श्वेतचंद्र हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध अभिनेते आहेत साजना, लक्ष्य, बाजी, बापमाणूस या कार्यक्रमांमध्ये त्यांनी काम केले आहे तसे सध्याच प्रकाशित झालेल्या “शिवरायांचा छावा..” या चित्रपटात जोत्याजी यांच्या भूमिकेत अभिनय केला.
8.Rahul Dev : राहुल देव हे एक भारतीय प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांनी बऱ्याच हिंदी, तेलगू ,तमिळ, कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच सध्याच प्रकाशित झालेला मराठी चित्रपट “शिवरायांचा छावा..” यात त्यांनी काकर खानाच्या भूमिकेत अभिनय केला.
9.Samir Dharmadhikari : समीर धर्माधिकारी हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध अभिनेते आहेत यांनी फत्तेशिकस्त ,सुभेदार ,फर्जंद या चित्रपटांमध्ये तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये काम केले आहे आणि सध्याच प्रकाशित झालेल्या “शिवरायांचा छावा..” या चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनय केला.
10.Amit Deshmukh : अमित देशमुख हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच सध्याच प्रकाशित झालेल्या “शिवरायांचा छावा..” या चित्रपटात कोंडाजी फर्जंद यांच्या भूमिकेत अभिनय केला.
11.Bhushan Shivtare : भूषण शिवतरे हे भारतीय अभिनेते आहेत त्यांनी सुभेदार या चित्रपटात काम केले आहे तसेच सध्याच प्रकाशित झालेल्या “शिवरायांचा छावा..” या चित्रपटात येसाजी कंक यांच्या भूमिकेत अभिनय केला.
12.Avdhut Gandhi : अवधूत गांधी हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध संगीतकार आहेत त्यांनी सध्याच प्रकाशित झालेल्या “शिवरायांचा छावा..” या चित्रपटात रामचंद्रपंत अमात्य यांच्या भूमिकेत अभिनय केला.
13.Aashutosh Vadekar : आशुतोष वाडेकर हे महाराष्ट्राचे अभिनेते आहेत त्यांनी मुरांबा या कार्यक्रमात काम केले आहे तसेच सध्याच प्रकाशित झालेल्या “शिवरायांचा छावा..” या चित्रपटात खेमचंद मारवाडी यांच्या भूमिकेत अभिनय केला.
14.Dipti Lele : दीप्ती लेले ही भारतीय अभिनेत्री आहे तिने बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केले आहे तसेच सध्याच प्रकाशित झालेल्या “शिवरायांचा छावा..” या चित्रपटात खेळणीवाली बकुळा यांच्या भूमिकेत अभिनय केला.
15.Sachin Bhilare : सचिन भिलारे हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांनी पावनखिंड, शेरशिवराज या चित्रपटात काम केले तसेच सध्याच प्रकाशित झालेल्या “शिवरायांचा छावा..” या चित्रपटात यांनी भाव्या यांच्या भूमिकेत अभिनय केला.
1 thought on “Shivrayancha Chhava Movie Review | Shivrayancha Chhava Movie Cast | छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची प्रेरणादायी शौर्यगाथा”